
देशभरात लगीन सराईचा हंगाम सुरू झाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वाजत-गाजत लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. तसेच अनेक तरुण मुलं सध्या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत. एकीकडे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. तर दुसरीकडे दोन मैत्रिनींनीच आपापसात लगीन गाठ बांधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आम्हाला पुरुषांमध्ये इंटरेस्ट नाही, असं म्हणत या तरुणींनी गॅस स्टोला साक्ष ठेवल आणि सात फेरे घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसर, सदर तरुणी या बिहारच्या सुपैल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज येथील रहिवासी आहेत. दोघींची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीच रुपांतर पुढे प्रेमात झालं. बराच काळ दोघींनी एकत्र घालवला अखेर मंगळवारी (23 डिसेंबर 2025) दोघींनीही लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्रिवेणीगंज येथील एका मंदिरात त्या पोहोचल्या आणि त्यांनी गॅस स्टोला साक्ष ठेवत सात फेरे घेतले. सध्या बिहारमध्ये पुजा गुप्ता आणि काजल कुमारी यांच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.




























































