
थंडीच्या दिवसातही अचानक वातावरण बदलल्यामुळे हवेचा दाब, तापमान, दमटपणा इत्यादींमध्येही झपाटय़ाने बदल होतो. त्यामुळे मेंदूतील नसांवर ताण येऊन मायग्रेनचा त्रास उद्भवू शकतो.
अशा प्रकारे मायग्रेनचा अचानक त्रास झाल्यास काही गोष्टी वरून पाहा. डोके आणि मानेला बर्फाचा शेक दिल्यास नसांवरील ताण कमी होतो. शांत व अंधाऱ्या खोलीत 15-20 मिनिटे आराम केल्याने मेंदूला आराम मिळतो.
पुदीना किंवा लव्हेंडरचे असेंशियल ऑईल कानपटीवर लावल्यास नसांना आराम मिळतो.
























































