
- कडधान्य लवकर खराब होऊ नये यासाठी काही घरगुती उपाय करून पाहा. घरी धान्य साठवण्यासाठी काच, प्लॅस्टिक किंवा अॅल्युमिनियमच्या हवाबंद डब्याचा वापर करावा. धान्यांमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात काही लवंगा ठेवाव्यात, यामुळे धान्याला कीड लागत नाही. कडुनिंबाची सुकलेली पानेही वापरू शकता.
- कडधान्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकल्याने कीड लागत नाही. कडधान्य शक्यतो कोरडय़ा ठिकाणी ठेवावी. ज्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश येणार नाही. धान्य साठवण्यापूर्वी ते कोरडे आहेत का हे नीट तपासून घ्या. नाहीतर कडधान्याला बुरशी लागेल. कडधान्यासाठी ओलावा हा चांगला नाही.


























































