चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी मिथिलेश नरळकर, शिवसेनेतर्फे युवा नेतृत्वाच्या खांद्यावर जबाबदारी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण नगर परिषद गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक मिथिलेश मनोहर नरळकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शिवसेनेच्या विचारांशी प्रामाणिक राहून, सत्तेच्या वाऱ्याला न झुकता जनतेच्या वेदना आणि प्रश्नांना प्राधान्य देणारा चिपळूणचा बुलंद आवाज म्हणून मिथिलेश नरळकर पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी चिपळूण नगर पालिकेत काम केले असून, त्यांना प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. सध्या शिवसेना उबाठा गटाचे ५ नगरसेवक आहेत.