मोहम्मद शमीचं रुबाबात पुनरागमन होणार? देशांतर्गत क्रिकेटमध्ये धारधार गोलंदाजी

गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियापासून लांब असणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियामध्ये पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार प्रदर्शन करत फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. त्याचा बहरदार खेळ अजूनही सुरूच असून BCCI निवडकर्त्यांच लक्ष त्याने आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

मोहम्मद शमीने मागील काही दिवसांमध्ये धारधार गोलंदाजी करत आपला दम धाकवून दिला आहे. विजय हजारे करंडक आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने एकूण 17 विकेट घेतल्या आहेत. तसेच रणजी ट्रॉफीमध्ये त्याने फक्त चार सामने खेळले आणि 20 गडी तंबुत धाडले. मोहम्मद शमीने त्याला मिळालेल्या संधीचं वेळोवेळी सोने केले आहे. दुखापतीमुळे तो मागील बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहे. मात्र, त्याची ही प्रतिक्षा आता संपण्याची चिन्ह आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमधील मोहम्मद शमीच्या प्रदर्शावर आमचे बारीक लक्ष असल्याचे NDTV ला BCCI च्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. तसेच निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सुद्धा मोहम्मद शमीच्या प्रदर्शनावर आणि फिटनेसवर लक्ष ठेवून असल्याच म्हटलं आहे.