WTC 2025-27 – हिंदुस्थानची अटीतटीची लढाई, आणखी तीन मालिका बाकी; आता ‘या’ देशांना भिडणार

ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाचा खेळ सुमार राहिला आहे. त्यामुळे गुणतालिकेत टीम इंडियाची घसरगुंडी झाली असून संघ सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे आगामी तीन मालिकांमध्ये टीम इंडियाला दणक्यात पुनरागमन करावं लागणार आहे, अन्यथा टीम इंडियाचा पत्ता जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या शर्यतीतून कट होईल.

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 9 सामने खेळले असून चार सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे तर चार सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावाला लागला आहे. तर एका सामना अनिर्णीत सुटला. आता टीम इंडियाचे आणखी 9 सामने बाकी आहेत. या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाला दमदार प्रदर्शन करावं लागणार आहे. टीम इंडियाच्या सध्या तीन मालिका बाकी आहेत. यामध्ये पहिली मालिका श्रीलंका त्यानंतर न्यूझीलंड आणि तिसरी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. तिन्ही मालिकांमधील 9 सामने टीम इंडियासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

पश्चिम बंगालमध्ये जन्म अन् केरळशी नाळ; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात निवड झालेला जॉन जेम्स कोण आहे? जाणून घ्या…

टीम इंडियाची पहिली मालिकी श्रीलंकेविरुद्ध खेळली जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर एकून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमधील शेवटची मालिका टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. बॉर्डर-गावसकर करंडकासाठी ऑस्ट्रेलिया हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात पाच सामने खेळले जाणार आहेत. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आणि न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.