सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत, संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय, राज ठाकरे यांचा घणाघात

अवघ्या देशाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. हिंदुस्थानची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मुंबई महापालिकेमध्ये ज्यांची सत्ता त्यांचा राजकारणात दबदबा हा असतो. त्यामुळेच या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. मुंबईमध्ये आज सकाळी मतदान करुन आलेल्यांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, राज ठाकरे यांनी सहकुटूंब मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सध्याच्या घडीला सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारसह प्रशासनावर घणाघाती हल्ला केला.

सध्याच्या घडीला सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारसह प्रशासनावर घणाघाती हल्ला केला.

मोठी बातमी – मुंबईत मतदान केलेल्या मतदारांच्या बोटावरील शाई पुसण्याचा प्रकार उघडीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये येनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी काहीही सुरु आहे असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. यासंदर्भात अधिक बोलताना राज ठाकरे म्हणाले, पाडू हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही. हे मशीन आणलं हे कुणालाच का सांगितलं गेलं नाही असा सवाल त्यांनी पुन्हा एकदा विचारला. याआधीच्या निवडणुकांमध्ये मतदान केल्यानंतर, शाई लावली जायची. आता मात्र हे नवीन मार्कर पेन घेऊन आलेत.

निवडणूक आयोगाचा ढिसाळ कारभार, पहिल्याच सत्रात आढळला दुबार मतदार

आज लावण्यात आलेली शाई बाहेर पडल्यावर सॅनिटाइजर लावली की जातेय, हा कुठला प्रकार आहे? संपूर्ण प्रशासन हे आता सत्तेसाठी कामाला लागलं आहे. ही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशाप्रकारे देशात निवडणुका होणं हे चांगलं लक्षण नाही. माझं फक्त नागरिकांना आवाहन आहे, सर्वठिकाणी सतर्क राहा.. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला लिमिट आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.