
चंद्रपूरमध्येही मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. या निवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. तरीही काँग्रेस आघाडीवर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीचे अपेक्षित निकाल लागतील. यंत्रणाच्या खूप गैरवापर झाला. पैशांच्या खूप वापर झाला. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना रान मोकळं करून दिल होतं, अशा परिस्थितीतही काँग्रेसला पोषक वातावरण असेल. चंद्रपूर , अमरावती, कोल्हापूर लातूर ,जालना असे अनेक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रपुरात आमचे बहुमत असेल, असेही ते म्हणाले.

































































