
मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये निशिकांत शिंदे यांनी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा गड राखला. शिंदे यांनी मिंधे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी याबाबत प्रतिक्रीया देत असताना त्यांना अश्रू अनावर झाले.
“आज माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या दिवसाची मी वाट बघत होतो. माझी एकच शपथ होती सरवणकरांचं दादर, माहिम, प्रभादेवी मधून पुसून काढायचं होतं. बिल्डर लॉबीच्या सरवणकरांना प्रभादेवीतील लोकांनी दाबून टाकलंय. प्रभादेवीच्या तमाम जनतेने सरवणकरांना हरवले आहे”, असे महेश सावंत यांनी सांगितले.





























































