
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, आमरावती, अकोला येथे भाजप आघाडीवर आहे. मात्र, काही जागांवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे मामेभाऊ अमरावती येथून निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यांचा पराभव झाला आहे.
विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीसांना 2 मोठे धक्के बसले आहेत. फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती अमरावतीतून पराभूत झाले आहेत. तसेच फडणवीस यांचे निवटवर्तीय मानले जाणारे तुषार भारतीय यांचाही पराभव झाला आहे. या दोघांचा पराभव झाल्याने फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नागपूरमध्ये भाजप आघाडीवर आहे. 151 मधील 94 जागी भाजप आघाडीवर आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसचे 31 उमेदवार आघाडीवर आहेत.
































































