भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला… हे करून पहा

भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला तर घरगुती टिप्सचा वापर करता येईल. एक किंवा दोन उकडून मॅश केलेले बटाटे घाला आणि शिजवून घ्या. यामुळे मसाल्यांची चव कमी होईल. बटाटय़ाऐवजी आपण ब्रेड स्लाईस घालू शकतो. जे पदार्थांची चव शोषून घेतात. ब्रेड घातल्यानंतर काही वेळाने लगेच बाहेर काढा.

भाजीमध्ये मसाले जास्त झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तांदळाचा उपयोग करा. ग्रेव्हीची भाजी असेल तर त्यात कच्चे तांदूळ एका लहान कापडी पॅकेटमध्ये घालून ठेवा. तांदूळ अतिरिक्त मसाले आणि ओलावा शोषून घेईल. नंतर ही तांदळाची पोटली बाहेर काढा.