
>> सुजाता बाबर
सूर्य जेव्हा एका राशीतून पुढील राशीत जातो, तेव्हा त्या क्षणाला पांत म्हणतात. भारतीय सौर वर्षात अशा बारा पांती येतात. त्यापैकी मकर पांत महत्त्वाची आहे. कारण त्या सुमारास सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते.
संक्रांत केवळ सण-परंपरेपुरता मर्यादित नसून तो पृथ्वी-सूर्य यांच्या गतीशी निगडित असलेला खगोलशास्त्रीय विषय आहे. भारतीय परंपरेत पांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो क्षण. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतच्या अक्षावर सुमारे तेवीस पूर्णांक पाच अंशांनी झुकलेली आहे. यामुळे वर्षभर सूर्य पृथ्वीवरील वेगवेगळ्या अक्षांशांवर निरनिराळ्या उंचीवर दिसतो. पृथ्वीवरून पाहिल्यास सूर्य जणू आकाशातील एका ठरावीक वर्तुळाकार मार्गावरून चालत आहे असा भास होतो. या मार्गाला आयनिक वृत्त म्हणतात. याचे बारा समान भाग कल्पून त्यांना राशी मानले जाते. सूर्य जेव्हा एका राशीतून पुढील राशीत जातो, तेव्हा त्या क्षणाला पांत म्हणतात. भारतीय सौर वर्षात अशा बारा संक्रांतीं येतात. त्यापैकी मकर पांत महत्त्वाची आहे. कारण त्या सुमारास सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. सूर्याचा भासमान प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे वळतो आणि दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात. म्हणूनच मकर पांतीला उत्तरायणाचा आरंभ मानला जातो. हा बदल पूर्णपणे खगोलशास्त्रीय असून त्याचा पृथ्वीवरील ऋतूंशी थेट संबंध आहे.
मात्र गेल्या काही शतकांत संक्रांतींच्या तारखांमध्ये सूक्ष्म बदल होत गेलेले दिसतात. पूर्वी मकर संक्रांत साधारणपणे जानेवारीच्या 12 तारखेला येत असे. आज ती 14 किंवा 15 जानेवारीला येते. यामागे एक अत्यंत महत्त्वाची पण सर्वसामान्यांना कमी परिचित असलेली प्रािढया कारणीभूत आहे ती म्हणजे पृथ्वीची परांचन गती. पृथ्वी स्वतभोवती फिरते आणि सूर्याभोवती परिभ्रमण करते हे सर्वज्ञात आहे. मात्र पृथ्वीचा अक्ष स्थिर नाही. फिरणाऱ्या भोवऱयासारखा पृथ्वीचा अक्ष अत्यंत संथ गतीने भोवऱयाप्रमाणे डुलत राहतो. या हालचालीला परांचन गती म्हणतात. या गतीची एक फेरी साधारणपणे 26 हजार वर्षांनी पूर्ण होते. ही हालचाल इतकी संथ आहे की एका पिढीत तिचा परिणाम जाणवत नाही, पण शतके उलटली की त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागतात. या परांचन गतीमुळे पृथ्वीवरून पाहिल्यास विषुवबिंदू आणि पांतींचे बिंदू हळूहळू आकाशात मागे सरकत जातात. भारतीय परंपरेत राशी या नक्षत्रांशी स्थिर मानल्या जातात. त्यामुळे सूर्याचा ज्या क्षणी एखाद्या राशीत प्रवेश होतो, तो क्षण दरवर्षी सुमारे 20 मिनिटांनी उशिरा येतो. हा विलंब एकत्र केला की काही दशकांत एक पूर्ण दिवसाचा फरक पडतो. याच कारणामुळे मकर पांत जी कधीकाळी जानेवारी 12 तारखेला येत होती ती आता 14 किंवा 15 जानेवारीला येते. आता लक्षात आले असेल की, पांत बदलत नाही, बदलते ती दिनदर्शिकेतील तारीख. सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा खगोलशास्त्राrयदृष्टय़ा निश्चितच असतो, पण पृथ्वीच्या अक्षाच्या डुलण्यामुळे तो क्षण सौर दिनांशी हळूहळू विसंगत होत जातो. ग्रेगरियन दिनदर्शिका ही पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे, तर भारतीय सौर पंचांग हे राशीस्थितीवर आधारलेले आहे. या दोन कालगणनांमधील फरक परांचन गतीमुळे सतत वाढत जातो.
हा बदल भविष्यातही सुरूच राहणार आहे. काही शतके गेल्यावर मकर पांत जानेवारी 16 किंवा 17 लाही येईल. पांतीची तारीख फेब्रुवारीतही जाईल ही शक्यता ऐकायला अचंबित करणारी वाटली तरी ती पूर्णपणे खगोलशास्त्राrय गणनांवर आधारलेली आहे. दर सुमारे 72 वर्षांत पांतीचा क्षण दिनदर्शिकेच्या तुलनेत जवळ जवळ एक दिवस पुढे सरकतो. काही हजार वर्षांनंतर मकर पांत जानेवारी अखेरीस पोहोचेल आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला येऊ लागेल. त्या काळातही उत्तरायणाचा खगोलशास्त्राrय अर्थ बदलणार नाही, पण मकर पांत हा सण ज्या ऋतूच्या सुरुवातीशी आज जोडला जातो, त्या ऋतूशी त्याचे कालांतराने अंतर वाढलेले दिसेल. म्हणूनच पांत फेब्रुवारीत जाणे ही परंपरेची विस्कळीत अवस्था नसून पृथ्वीच्या दीर्घकालीन गतीचा अपरिहार्य आणि गणिती निष्कर्ष आहे.
कालखंडानुसार मकर संक्रांतींची बदललेली तारीख
इ.स. दहावे शतक जानेवारी 10-11
इ.स. पंधरावे शतक जानेवारी 11-12
इ.स. अठरावे शतक जानेवारी 12-13
इ.स. विसावे शतक जानेवारी 13-14
इ.स. एकविसावे शतक जानेवारी 14-15
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)































































