बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 600 पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्रकडून अप्रेंटिसच्या 600 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 25 जानेवारी 2026 ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर देण्यात आली आहे. 600 पदांमध्ये सामान्य 302, अनुसूचित जाती 69, अनुसूचित जमानी 46, इतर मागासवर्ग 133, आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटक 50 या पदांचा समावेश आहे. अर्ज करणाऱया उमेदवाराचे वय किमान 20 ते कमाल 28 वर्षे असायला हवे.