टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानचाच; रवी शास्त्रींची भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी–20 वर्ल्ड कपचे वाद शमता शमत नसली तरी ही स्पर्धा हिंदुस्थानच गाजवणार असल्याची आणखी एक भविष्यवाणी समोर आलीय. आता ही भविष्यवाणी हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू, समालोचक रवी शास्त्री यांनी वर्तवली असून जगज्जेता हिंदुस्थानच यंदा इतिहास घडवेल आणि सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनेल, अ सा विश्वास आणि भाकीत शास्त्राr यांनी वर्तवले आहे. हा आत्मविश्वास केवळ अंदाजावर नव्हे, तर हिंदुस्थानच्या सातत्यपूर्ण आणि दबदबा निर्माण करणाऱ्या कामगिरीवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेय.

2024 मध्ये टी–20 विश्वचषक जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा विजयाचा प्रवास थांबलेलाच नाही. त्यानंतर खेळलेल्या कोणत्याही द्विपक्षीय मालिका किंवा स्पर्धेत हिंदुस्थान पराभूत झालेला नाही. विजय-पराभवाचे गुणोत्तर थेट 32-5 असे असून, ही आकडेवारीच प्रतिस्पर्ध्यांसाठी इशाराच ठरत आहे.

टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला हिंदुस्थान सध्या जगातील सर्वांत संतुलित आणि ताकदवान संघ मानला जातो. अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मा आणि अव्वल क्रमांकाचा गोलंदाज वरुण चक्रवर्ती आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवत आहेत. शास्त्राRच्या मते खेळाडूंचा सध्याचा फॉर्म, तंदुरुस्ती आणि सातत्याने मिळणारा आंतरराष्ट्रीय अनुभव यामुळे हिंदुस्थानच जगज्जेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरतो. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीत हिंदुस्थानची वाटचाल जवळपास अपराजित राहिली आहे. डिसेंबरमध्ये 2024 विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने पराभूत करत हिंदुस्थानने आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही हिंदुस्थानने 3-1 अशी अजेय आघाडी घेत आपला विजयाचा झेंडा फडकावत ठेवला आहे.

शास्त्रींच्या मते, निवड समितीने युवा जोश आणि अनुभवी खेळाडूंचा अचूक समतोल साधला आहे. काही खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार असल्याने त्यांच्यावर अपयशाचे ओझे नाही, तर मागील विश्वविजयाचा अनुभव घेतलेले खेळाडू संघाला स्थैर्य देतात. जसप्रीत बुमरासारखा भेदक गोलंदाज, अभिषेक शर्मानामक त्सुनामी, हार्दिक पंडय़ासारखा अष्टपैलू आणि शिवम दुबेसारखा फॉर्मातला फलंदाज यामुळे हिंदुस्थान अधिकच धोकादायक ठरत आहे.