बँक अधिकाऱ्याच्या घरी हातसफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका खासगी बँक अधिकाऱ्याच्या घरी चोरटय़ाने हातसफाई करून साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या बोरिवली येथे राहतात. त्यांचा कांदिवली येथे रूम आहे. मुलाच्या शिक्षणासाठी ते कांदिवली येथे राहतात. ते अधूनमधून बोरिवली येथे जात असतात. त्याने बोरिवली येथील रूममध्ये सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने ठेवले होते.

15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होते. ते मतदान करण्यासाठी बोरिवली येथील फ्लॅटमध्ये आले होते. मतदान केल्यानंतर ते सर्व जण कांदिवली येथे निघून गेले. दोन दिवसांपूर्वी त्याना शेजारी राहणाऱ्या एकाने पह्न केला. पह्न करून घरात घरपह्डी झाल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे बोरिवली येथील रूममध्ये आले. त्याने घरात प्रवेश केला. तेव्हा कपाटातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. घडल्या प्रकरणी त्याने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.