
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याचबद्दल मुंबईत माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “मी दिल्लीला जात आहे. उद्या लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभागृह नेता असल्याने मला जावं लागणार आहे.” त्या म्हणाल्या की, “सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही.”




























































