
अमेरिकन नागरिकांना स्वस्तात औषधे मिळावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे एक नवीन वेबसाईट लाँच करणार आहे. यासाठी त्यांनी 16 कंपन्यांशी करारसुद्धा केला आहे. या करारांतर्गत कंपन्यांना 3 वर्षांची टॅरिफ सूट दिली जाईल. ट्रम्प प्रशासन लवकरच ट्रम्प आरएक्स नावाची एक नवीन सरकारी वेबसाईट लाँच करणार आहे. या वेबसाईटवरून स्वस्तात औषधे खरेदी करता येतील. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून आतापर्यंत 16 मोठय़ा औषध कंपन्यांशी करार केले. या नव्या धोरणामुळे टाईप 2 मधुमेह, संधीवात, मल्टिपल स्क्लेरोसिस, दमा, सीओपीडी, हेपेटायटिस बी आणि सी, एचआयव्ही, कर्करोग आणि हृदयविकारसारख्या जुनाट, महागडय़ा आजारग्रस्त अमेरिकन रुग्णांना फायदा होईल.

























































