
सायबर गुन्हेगाराने बोरिवलीत राहणाऱ्या एका वृद्धाला तब्बल पाच लाख 44 हजार रुपयांना चुना लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिल्पा परब (69) या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला होता. तत्काळ बिल भरले नाही तर तुमची गॅस लाईन कट होईल अशी भीती दाखवत तुम्हाला एक लिंक देतो त्यावर जाऊन पेमेंट करा, असे समोरची व्यक्ती म्हणाली. अशा प्रकारे अज्ञात का@लरने शिताफीने त्यांच्या खात्यातील पैसे वळते केले.























































