Budget 2026 Live Updates – मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद…देशात 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्र सरकारचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारी रोजी संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. या अर्थसंकल्पाविषयी उद्योग जगतासह सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता आहे.

  • सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाही; आयकरात कोणताही बदल नाही
  • पादत्राणे, बॅटरी, मायक्रो ओव्हन स्वस्त होणार, सौर उर्जेसंबधीची उपकरणे स्वस्त होणार
  • चामडे आणि कपडे उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात
  • कॅन्सरच्या 17 औषधांवरील आयात शुल्कात कपात
  • बायोगॅस ब्रेंडेड सीएनजीवर कोणताही कर नाही
  • फ्युचर्स ट्रेडिंगवरील STT वाढवून 0.05 करण्यात आला आहे, ऑप्शन्स आणि ऑप्शन प्रीमियमवरील STT अनुक्रमे 0.15% आणि 0.125% करण्यात आला आहे.
  • शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढवला
  • क्लाउड सर्व्हिसेस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती
  • तांत्रिक चुकांसाठी आता कठोर शिक्षेऐवजी फक्त दंड आकारला जाईल. तांत्रिक त्रुटींना गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढून ‘दंडनीय’ करण्यात आले आहे.
  • छोट्या करविषयक गुन्ह्यांसाठी आता केवळ दंड भरावा लागेल, इतर कोणतीही मोठी कारवाई होणार नाही
  • अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत वाढवली
  • नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार, अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही कर नाही, आयकर परतावा भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत
  • करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार
  • चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4 टक्के, पुढल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्के राहण्याचा अंदाज
  • दिव्यांगजनांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘दिव्यांग सहारा योजने’ची घोषणा
  • 1 कोटी शेतकरी नारळाच्या शेतीवर अवलंबून, नारळ संशोधन केंद्राची स्थापना करून उत्पादन वाढवणार
  • 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार, मत्स्यव्यवसात महिलांचा सहभाग वाढवणार
  • हिंदुस्थानच्या काजू, कोकोला जागतिक ब्रँड बनवणार, काजूसाठी प्रोसेसींग युनीट उभारणार
  • दशकभरासाठी ‘खेलो इंडिया मिशन’ची घोषणा, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे, प्रशिक्षण, स्पर्धा भरवणार
  • पहिली ‘जागतिक व्याघ्र परिषद’ हिदुस्थानात होणार
  • 95 देशांची कॅट परिषद हिंदुस्थानात भरणार, सरकारचे प्रमुख आणि मंत्री परिषदेत भाग घेणार
  • नवीन सांस्कृतिक केंद्राची उभारणी करणार
  • ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी’ स्थापन करणार
  • देशातील 20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रावर 10 हजार गाईड्स निर्माण करणार
  • मुंबईत एबीजीसीची कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार
  • प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार, 15 हजार शाळांमध्ये कंटेट क्रियेटर केंद्र
  • जामनगरचे जागतिक आरोग्य संघटनेचे केंद्र आधुनिक करणार
  • देशभरात तीन नवीन एम्स उभारणार
  • पशुवैद्यक कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अर्थसहाय्य करणार
  • कोविडनंतर योग आणि आयुर्वेदाला जगभरात मान्यता मिळाली, आयुर्वेद अभ्यासासाठी 3 नव्या संस्था स्थापन करणार
  • हिंदुस्थानला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार, देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन करणार
  • परदेशातील हिंदुस्थानींसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक मर्यादेत वाढ
  • 10 वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले
  • कंटेनर निर्मितीसाठी 10 कोटींची तरतूद
  • टायर-2, टायर-3 शहरांच्या विकासासाठी 5 हजार कोटींची तरतूद
  • 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार; मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवणार
  • वाराणसी आणि पाटणा येथे जहाज बांधणी केंद्र उभारणार
  • कोस्टल शिपिंग 6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट
  • 20 नवीन जलमार्गाची घोषणा, 2047 पर्यंत जलमार्गाचे जाळे 12 टक्क्यांपर्यंत वाढवणार, ओडिशात 22 नवे जलमार्ग निर्माण करणार, पुढच्या 5 वर्षात 20 राष्ट्रीय जलमार्ग सुरू करणार
  • 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातील पायाभूत सुविधा वाढवणार, 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरणार
  • ‘आत्मनिर्भर भारत’साठी 2 हजार कोटींची तरतूद
  • सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी 10 हजार कोटींची तरतूद
  • हातमागासाठी ‘महात्मा गांधी ग्रामस्वराज अभियान’ राबवणार
  • वस्त्रोद्योग, हातमाग आणि हस्तकला उद्योगांना चालना देणार, मेगा टेक्सटाईलची उभारणी करणार
  • आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे हे आमचे लक्ष्य
  • बायोफार्मा शक्तीसाठी 10 हजार कोटींची तरतूद, तीन मोठ्या केमिकल पार्कची स्थापना करणार
  • केरळ, आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये दुर्मीळ खनिज उत्खनन केंद्रे
  • सेमी कंडक्टर क्षेत्रावर जास्त भर देत असून सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद
  • कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे स्वस्त करणार
  • हिंदुस्थानला औषध निर्मितीचे केंद्र बनवत आहोत
  • विकास दर वाढावा म्हणून आम्ही सहा क्षेत्रांवर भर देत आहोत
  • आर्थिक विकास दरात वाढ हे आमचे पहिले कर्तव्य आहे
  • आत्मनिर्भर भारत हे सरकारचे लक्ष्य आहे
  • कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यावर भर
  • लोकांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य
  • आमची सुधारणांची एक्सप्रेस वेगाने धावत आहे
  • आम्ही देशातील गरिबी निर्मुलनासाठी महत्त्वाचे काम केले
  • 350 हून अधिक सुधारणा आम्ही केल्या
  • 12 वर्षांपासून नियोजनबद्ध विकास सुरू
  • संत रविदास यांचे नाव घेऊन सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात
  • हे ‘रिफॉर्म’ नाही, तर ‘डिफॉर्म बजेट आहे. हा अर्थसंकल्प देशातील केवळ 5 टक्के लोकांसाठी आहे. भाजप फक्त आपल्या माणसांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, असे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले.
  • अर्थसंकल्पाकडून जास्त अपेक्षा नाहीत, असे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव म्हणाले.

  • गरीबांसाठी घोषणा आणि उद्योगपतींचे हित असा अर्थसंकल्प असू नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पास मंजुरी
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचल्या, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक सुरू
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थमंत्रालयाचे प्रमुख अधिकारी संसदेत दाखल

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले, थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक
  • अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराची सावध प्रतिक्रिया, घसरणीनंतर बाजारात किरकोळ तेजी
  • अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शुभ संकेत म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दही-साखर दिले.

  • अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

  • अर्थ मंत्रालयातून अर्थसंकल्प घेऊन निर्मला सीतारमन राष्ट्रपती भवनाकडे रवाना, 11 वाजता सादर करणार अर्थसंकल्प

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज नवव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प