
रविवारी (01 फेब्रुवारी 2026) सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात एका सुटकेसमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुटकेस तपासली असता बॅगमध्ये एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढलून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
बिहारमधील रोहतास जिल्ह्यामधील सासाराम रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण हादरून गेले आहेत. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली असता सदर मृतदेह 25 वर्षीय मैरून खातूनचा असल्याचं उघड झालं आहे. चांदोली येथील सकलदिहा स्टेशनजवळील बटघी गावची ती मुळ रहिवासी आहे. तिचा विवाह बीघा गावातील मोहम्मद कमहुद्दीनसोबत झाला होता. दरम्यान, मृत मैरूनच्या कुटुंबीयांनी पतीसह तिच्या सासू-सासऱ्यांवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. मोहम्मदचे मामीच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
बिहार के सासाराम के मंडी बाज़ार में एक लाल ट्रॉली बैग से लड़की का शव मिला है #Bihar pic.twitter.com/aPbgdWP3Bp
— Mukesh singh (@Mukesh_Journo) February 1, 2026





























































