बजेटनंतर अखेर शेअर बाजार सावरला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच रविवारी सादर केलेल्या बजेटनंतर शेअर बाजार कोसळला होता. परंतु, या आठवड्यातील पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी 943 अंकांनी वधारून 81,666 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 263 अंकांनी वाढून 25,088 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील पावर ग्रीडमध्ये 7.61 टक्के आणि अदानी पोर्टस्मध्ये 4.76 टक्के वाढ पाहायला मिळाली. याशिवाय, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स वाढले.