
बारामती येथील विमानत अपघातात मृत्युमुखी पडलेलेल्या फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंकीच्या कुटुबिंयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले व या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या समवेत ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांना दिला. आदित्य ठाकरे यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे.
View this post on Instagram
बारामती येथे 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात फ्लाईट अटेन्डेंट पिंकी माळी या तरुणीचा देखील समावेश होता. पिंकी माळी या वरळीतील साई सुंदर नगर येथील रहिवाशी होत्या.
माझ्या वरळी मतदारसंघातील साई सुंदर नगर येथील रहिवासी आणि केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळी ह्यांचे बारामती येथील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज माळी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ह्या कठीण प्रसंगी शिवसेना त्यांच्या समवेत ठामपणे उभी आहे, असा विश्वास… pic.twitter.com/C3xEW2WPXC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 3, 2026


























































