
दोन समुदायांमधील हिंसाचाराने पेटलेल्या मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर संपणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट उठवण्यात येणार असून भाजपचे नेते युमनाम खेमचंद सिंह हे मणिपूरचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक झाली. त्यात युमनाम यांची नेतेपदी निवड करण्यात आली.





























































