
अमेरिकेने अरबी समुद्रात एक इराणी ड्रोन पाडले आहे. अमेरिकन नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणी ड्रोन यूएसएस अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेजवळ येत होते. एका अमेरिकन अधिकाऱयाने ही माहिती दिली आहे. अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार, इराणी ड्रोन अमेरिकन नौदलाच्या अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेजवळ येत होते. त्यानंतर, सैन्याने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली. एफ-35सी लढाऊ विमानाने इराणी ड्रोन पाडले. सध्या, ड्रोन कोणत्या उद्देशाने तैनात करण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेवर इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.




























































