वेगवान चेंडू आदळल्यामुळे बेन स्टोक्सचा चेहरा पडला काळानिळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ben stokes facial injury england test captain hit by ball during practice session

इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स सरावादरम्यान क्रिकेट चेंडू थेट चेहऱयावर लागल्याने जखमी झाला आहे. अचानक आदळलेल्या चेंडूमुळे त्याच्या उजव्या डोळ्याभोवती मोठी सूज आली असून डोळा काळानिळा पडला आहे. गाल व ओठांवर खरचटल्याच्या खुणा दिसत असून नाकावर पट्टी बांधलेली आहे.

स्टोक्सने स्वतः समाज माध्यमांवर जखमेचा पह्टो शेअर केला. “क्रिकेट चेंडूची अवस्था पाहायला हवी,’’ असे हलक्याफुलक्या शैलीतील वाक्य त्याने लिहिले असले, तरी पह्टो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे. अॅशेस मालिकेतील पराभवानंतर आधीच दबावात असलेल्या इंग्लंडसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. स्टोक्सची तंदुरुस्ती आणि आगामी कसोटी हंगामातील उपलब्धता याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.