
गुलाबाच्या रोपावर कीड लागली तर तिथल्या भागाची लगेचच छाटणी करा.
त्यामुळे कीड निघून जाते आणि आजूबाजूला पसरून रोपांचं जास्त नुकसान होत नाही.
यानंतर रोपावर पाणी मारा आणि संपूर्ण रोप स्वच्छ धुवून घ्या.
हळदीचं पाणी संपूर्ण रोपावर शिंपडा तसेच थोडं पाणी मातीतही घाला.
नीम ऑईलदेखील रोपांवर पडलेला रोग घालविण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.
मुंग्या मारण्यासाठी असणारा खडूही पाण्यात विरघळून घ्या. त्यानंतर हे पाणी रोपावर शिंपडा.


























































