पावसाळ्यापूर्वी दिंडोशीतील कल्व्हर्टचे काम पूर्ण करा! शिवसेनेची मागणी, पालिका अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेलसमोरील भागात कल्व्हर्टस् बनविण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने या कामाची पाहणी करण्यात आली तसेच पावसाळय़ापूर्वी कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पावसाळय़ात दिंडोशीतील रत्नागिरी हॉटेलसमोर पाणी साचल्यामुळे नागरी निवारा म्हाडा संकल्प येथील लोकांना त्रास होत होता. याबाबत विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. 40 चे नगरसेवक तुळशीराम शिंदे व प्रभाग क्र. 41 चे नगरसेवक सुहास वाडकर यांच्या सतत पाठपुराव्यामुळे येथे कल्व्हर्ट बनविण्यात येत आहे. नुकताच आमदार सुनील प्रभू, नगरसेवक तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर यांनी कामाचा आढावा घेतला.  

बेकायदेशीर पार्किंग हटवा!

कल्व्हर्टस् तयार करताना या ठिकाणी ट्रफिक जाम होत असून येथील बेकायदेशीर पार्किंगउठवून रस्ता मोकळा करावा, अशी सूचना आमदार प्रभू यांनी केली. यावेळी पालिकेच्या पी उत्तरचे मेंटेनन्स विभागसहित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, उपविभागप्रमुख भाई परब, उपसमन्वयक प्रशांत घोलप, शाखाप्रमुख संदीप जाधव, संपत मोरे आदी उपस्थित होते.