
कढीपत्ता म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. परंतु कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. पण असं असलं तरी, कढीपत्ता आणि केस याचंही जवळचं नातं आहे. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा आहे. कढीपत्त्यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे समृद्ध पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप गरजेचे असतात. केस तुटणे आणि गळण्यावरही कढीपत्ता खूप उपयोगी मानला जातो.
कढीपत्ता आणि कापूर दोन्हीही कोंड्याच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय आहे. तुम्हाला कोंड्यामुळे खाज येत असेल तर, कढीपत्ता आणि कापूर बारीक करून पेस्ट तयार करावी. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी चांगली चोळून लावावी. किमान 1 तास हा पॅक तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत.
केस गळती रोखण्यासाठी कढीपत्त्यापासून तेल बनवून वापरू शकतो. यासाठी मोहरीच्या तेलात कढीपत्ता शिजवा आणि केसांना लावा. थोडा वेळ मालिश करा. हे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण देईल आणि केसांची वाढ जलद होण्यास मदत करेल. याशिवाय, त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमचे केस जलद वाढण्यास मदत करतील.
काळ्या केसांसाठी आपण कढीपत्ता सेवन करु शकतो. याकरता किमान 5 ते 7 कढीपत्त्याची पाने रोज धुवून खायला हवीत. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाणे हे खूपच फायद्याचे आहे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी आणि सी वाढीसाठी चालना मिळते. तसेच कढीपत्त्यामध्ये असलेले घटक कोलेजन वाढवण्यासही मदत करतात.
कढीपत्ता आणि आवळा
वापरण्याच्या पद्धतीनुसार, आवळा (इंडियन गुसबेरी) घ्या आणि तो ब्लेंडरमध्ये बारीक करा. त्यात मूठभर कढीपत्ता घाला आणि बारीक करा. ही पेस्ट तुमच्या केसांना लावा आणि १ ते २ तासांनी केस धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा लावता येतो.
बाजारातून कांदे बटाटे आणल्यावर अशापद्धतीने ठेवायला हवेत, वाचा
कढीपत्ता आणि मेथी
हा हेअर मास्क बनवण्यासाठी, अर्धा कप कढीपत्ता, अर्धा कप मेथीचे दाणे आणि एक आवळा एकत्र करा. पेस्ट पातळ करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घाला. नंतर, कढीपत्त्याचा हेअर मास्क मुळांपासून टोकांपर्यंत लावा, अर्धा तास तसेच राहू द्या आणि नंतर धुवा.
कढीपत्ता आणि नारळ तेल
एका भांड्यात नारळ तेलात १० ते १२ कढीपत्त्याची पाने चांगली शिजवावी. कढीपत्ता काळा पडल्यानंतर हे भांडे थंड होऊ द्यावे. त्यानंतर हे तेल एका बाटलीत साठवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला ते वापरायचे असेल तेव्हा ते थोडेसे गरम करा आणि केसांना मसाज करा.
दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आपल्या आहारात कोणती फळे समाविष्ट करायला हवीत, वाचा
कढीपत्त्याचे पाणी
कढीपत्त्याचा वापर केवळ केस लांब करण्यासाठीच नाही तर केसांतील कोंडा कमी करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. एका ग्लास पाण्यात १७-१८ कढीपत्त्याची पाने उकळा. पाणी थंड करा आणि केस धुण्यापूर्वी केसांवर ओता. १० मिनिटांनी साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
कढीपत्ता आणि दही
केस खूप विरळ होत असतील तर, कढीपत्त्याचा हेअर मास्क लावायला हवा. याकरता ४-५ चमचे दह्याचे मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या केसांवर अर्धा तास राहू द्या आणि नंतर धुवा. तुमचे केस चमकदार दिसतील.





























































