फळांचा रस की अख्खं फळ खायला हवं, आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम काय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या स्वादिष्ट फळांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला फक्त चांगले वाटेलच असे नाही तर आश्चर्यकारक आरोग्य फायदे देखील मिळतील. फळे शरीरासाठी अमृत मानली जातात. हंगामी फळे खाल्ल्याने आजार टाळता येतात आणि आरोग्य सुधारते. अलीकडे अनेकजण फळांचा रस पिण्यास प्राधान्य देतात. बहुतेकांना अख्खे फळ खाण्यापेक्षा फळांचा रस पिणे हे अतिशय योग्य वाटते. परंतु आहारतज्ञांच्या मते, फळे आणि फळांचा रस यात खूप फरक आहे.

उन्हाळ्यात आवळा का खायला हवा, जाणून घ्या

आपण अख्खे फळ खातो तेव्हा त्यात असलेले सर्व फायबर आपल्याला मिळते. फायबर शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ते पचनसंस्था आणि रक्तातील साखरेची पातळी राखते. तसेच वजन कमी करण्यास देखील मदत करते. सफरचंद, संत्री, पेरू आणि पपई यांसारख्या फळांमध्ये विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असते, जे बद्धकोष्ठता, लठ्ठपणा आणि हृदयरोग टाळण्यास मदत करते. जेव्हा आपण फळांचा रस काढतो तेव्हा फायबर काढून टाकले जाते. शिवाय, साली किंवा तंतूंमध्ये असलेले अनेक जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स देखील नष्ट होतात. एकूणच, फळांचा रस काढल्याने फळांमधील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात.

मधुमेही रुग्णांनी साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी आहारात कोणत्या फळांचा समावेश करायला हवा

आहारतज्ज्ञांनी स्पष्ट केले की, फळे खाल्ल्याने जास्त फायदे होतात कारण त्यात जास्त पोषक घटक असतात. फळांचा रस त्याचे पौष्टिक मूल्य कमी करतो आणि जर साखर घातली तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लक्षणीयरीत्या वाढतो. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. ताज्या फळांचा रस एकवेळ ठीक आहे. परंतु पॅकेज केलेला रस मात्र टाळायलाच हवा. त्यात केवळ साखरच नाही तर अनेक प्रिझर्व्हेटीव्ह घटक देखील असतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. रस लवकर पचतो, यामुळे अल्पकालीन ऊर्जा मिळते, परंतु त्यामुळे लवकर भूक लागते. यामुळे जास्त खाणे होऊ शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते. शिवाय, रिकाम्या पोटी रस पिल्याने गॅस, आम्लता किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

उन्हाळ्यामध्ये बेलफळ का खायला हवे, जाणून घ्या

ताज्या फळांचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु त्यात साखर मिसळू नये. ज्यांना अशक्तपणा, ताप किंवा पचन समस्या आहेत त्यांच्यासाठी फळांचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. लहान मुले, वृद्ध किंवा आजारी असलेल्यांसाठी ताज्या फळांचा रस हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि तुमचे वजन, पचन आणि साखर नियंत्रित करू इच्छित असाल तर थेट फळे खाणे हा रसापेक्षा खूप चांगला पर्याय आहे. रस कधीकधी फायदेशीर ठरू शकतो, परंतु दररोज फळे खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते.