
जवानांचा एक अतिशय सुंदर, अतिशय उत्साहवर्धक व्हिडीओ व्हायरल होत आहे व्हिडीओमध्ये जवान 18,000 फूट उंचीवर आणि उणे 50 अंश सेल्सिअस तापमानात ‘नागीन डान्स’ करताना दिसत आहेत. सियाचीन किंवा गलवानसारख्या अत्यंत थंड भागात शरीर स्थिर राहिल्यास रक्त गोठण्याची किंवा ‘फ्रॉस्टबाइट’ होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत डान्स, उडय़ा मारणे किंवा हालचाल करणे हे शरीरासाठी ‘नॅचरल हीटर’सारखे काम करते, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. हा व्हिडीओ silentpatriot3 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून ‘जय हिंद’च्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

























































