
विदेशात हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वाढतच असून कॅनडात एका 37 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
चंदन कुमार राजा नंदकुमार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकचा आहे. मागील सहा-सात वर्षांपासून तो कॅनडात होता. लार्सन अँड टुब्रोची सहयोगी कंपनी एलटीआय माइंडट्रीमध्ये तो कार्यरत होता.
‘कन्नाडा असोसिएशन’ ठरले कारण
चंदन कुमार यांच्या हत्येने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ‘‘चंदन हिंदुस्थानात परत यावा यासाठी आम्ही त्याला विनंती करत होतो. मात्र त्याने आमचा सल्ला मानला नाही. कॅनडामध्ये ‘कन्नाडा असोसिएशन’ स्थापन करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्यातूनच त्याच्यावर हल्ला झाला असावा,’’ असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

























































