
शेवगा आणि शेवग्याची पाने आपल्या आरोग्यासाठी दोन्ही खूप गरजेची आहेत. शेवगा हा पोषक तत्वांनी परिपूर्ण असून, त्याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. एकूणच आपल्या आरोग्यासाठी शेवगा हा वरदानापेक्षा कमी नाही. शेवग्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने, रक्तनिर्मितीसाठी शेवगा खूप महत्त्वाचा मानला जातो. शेवग्याचे आहारामध्ये कशापद्धतीने वापर करायला हवा हेही जाणून घेणे गरजेचे आहे.
शेवग्याच्या पानांचा चहा: तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर शेवग्याच्या पानांचा चहा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. शेवग्याची पाने पाण्यात उकळू शकता किंवा कोमट पाण्यात थोडी शेवग्याच्या पानांची पावडर विरघळवून रिकाम्या पोटी सेवन करू शकता. यामुळे शरीराचे विषारी पदार्थ देखील बाहेर पडतील, ज्यामुळे वजन नियंत्रण, पचन सुधारणे आणि निरोगी त्वचा यासह अनेक फायदे मिळतील.
त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा
स्मूदीजमध्ये शेवग्याची पाने घालून आहारात समाविष्ट करु शकता. निरोगी राहण्यासाठी स्मूदीज पित असाल, तर तुमच्या आहारात शेवग्याची पाने समाविष्ट करणे आणखी सोपे आहे. फळे आणि भाज्यांपासून बनवलेल्या स्मूदीजमध्ये थोडी शेवग्याची पाने किंवा पावडर घालता येतात. हा एक उत्तम नाश्ता पर्याय आहे जो तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवेल आणि अस्वस्थ खाण्यापासून रोखेल.
शेवग्याच्या शेंगाचे आणि पानांचे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. हे एक स्वादिष्ट सूप असून अनेक पोषक तत्व या सूपमध्ये आढळतात. दक्षिणेकडे सांबारमध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगांचा वापर केला जातो.
शेवग्याच्या पानांचे पराठे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. मुलांना हे असे पराठे डब्यातही देता येतील.
सॅलडमध्ये देखील शेवग्याच्या पानांचा वापर योग्यरित्या करता येईल. वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. चिरलेला कांदा आणि टोमॅटोसह मूग आणि काळे चणे यासारखे अंकुरलेले धान्य घालून सलाड करता येईल. यामध्ये अर्धा चमचा शेवग्याची पावडर किंवा शेंगांचा गर घालू शकता. यात नंतर थोडे काळे मीठ, काळी मिरी आणि लिंबाचा रस घालावा. यामुळे प्रथिने देखील मिळतील आणि स्नायू सुद्धा मजबूत होतील.
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कोणती घरगुती पेये उपयुक्त आहेत, जाणून घ्या
शेवग्याच्या पानांची चटणी हा एक उत्तम पर्याय आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. दक्षिण भारतात, वाळलेल्या शेवग्याच्या पानांपासून चटणी केली जाते. आरोग्यासाठी ही चटणी खूप उपयुक्त मानली जाते.

























































