
दह्यापासून चटकन लोणी निघावे आणि भरपूर तूप यावे, यासाठी काही टीप्स जाणून घेऊया. दुधावरची साय दररोज नियमितपणे एका भांडय़ामध्ये जमा करावी लागते. जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस जमवलेल्या सायीचे तूप करावे.
साय पातेल्यात जमा केल्यानंतर ती फ्रीजमधून बाहेर काढून त्यात विरझण घालावे. यानंतर ती साय 8 ते 10 तास रूम टेम्परेचरवर ठेवावी. सायीचे दही एकदा लागले की लगेच त्याचे लोणी करावे. वेळ नाही म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवू नका.





























































