
लोकल ट्रेनच्या प्रवासातील अनेक घटना, प्रसंग दररोज व्हायरल होत असतात. एका तिकीट कलेक्टरचा (टीसी) असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या टीसीची उंची अगदी नजरेत भरणारी आहे. ते एवढे उंच आहेत की त्यांचे डोके लोकलच्या डब्यातील हॅण्डलच्याही वर जाते. जवळपास टीसीला खाली वापून डब्यातून चालावे लागतेय. त्यांच्या उंचीने लक्ष वेधून घेतलेय. हा व्हिडीओ @avinashmohite89 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. मुंबईतील अनेक प्रवाशांनी टीसीला ओळखले आणि त्यांचे अनुभव शेअर केले आहेत.































































