
जगात आणखी दोन देश युद्धाच्या दिशेने जात आहेत. आफ्रिकी देश इथिओपियाने इरिट्रियाविरुद्ध युद्ध करण्यासाठी सीमेवर जवानांची तैनाती केली आहे. इरिट्रियाकडून आमच्या देशातील बंडखोरांना शस्त्रसाठा पुरवला जात आहे, असा इथिओपियाचा आरोप आहे. यामुळे दोन्ही देशांतील सीमेवर चिंतेचे वातावरण आहे. इरिट्रिया आणि इथिओपिया हे दोन्ही देश शेजारी देश आहेत. 1993 मध्ये इथिओपियापासून वेगळे होऊन इरिट्रिया हा स्वतंत्र देश झाला आहे. या दोन्ही देशात ईसाई धर्माची संख्या जास्त असून मुस्लिम समाज या ठिकाणी अल्पसंख्याक आहे.
बंडखोरांविरुद्ध कारवाईच्या नावावर इथिओपियाची लष्कर पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इथिओपिया सध्या तिग्ने बंडखोरांच्या कारवायांमुळे त्रस्त आहे. या बंडखोरांना शस्त्र पुरवण्याचे काम इरिट्रिया करत आहे, असा इथिओपियाचा आरोप आहे. या दोघातील सततच्या संघर्षामुळे पश्चिमेतील अनेक देश चिंतेत आहेत. दोन्ही देशांना युद्धाची खुमखुमी आहे. एकीकडे इथिओपियाचे लष्कर आहे तर दुसरीकडे इरिट्रियाचे लष्कर आहे. या दोन देशांमध्ये कधीही युद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती आहे. 2020 ते 2022 या दरम्यान इथिओपियात इरिटियाच्या जोरावर तिग्नेने धुमापूळ घातला होता.



























































