
मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि जेबीसीएन यांच्या पुढाकाराने आयोजित सुपर कप शालेय क्रिकेट स्पर्धेत हॅरिस शील्ड विजेत्या अंजुमन इस्लाम संघानेच शेष शालेय संघाचा 5 विकेट राखून सहज पराभव केला. शेष शालेय संघाने शौर्य पाटीलच्या 67 धावांच्या जोरावर सर्वबाद 188 अशी मजल मारली होती तर अंजुमनने लक्ष्मीप्रसाद विश्वकर्मा (66) आणि युवराज भिंगारे (ना. 37) यांच्या फटकेबाजीमुळे विजयी लक्ष्य 33.2 षटकांतच गाठत बाजी मारली. शेष शालेय संघाकडून विराट यादवने 42 धावांत 3 विकेट घेतले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रणजीपटू अभिज्ञान पुंडू, एमसीए सचिव उन्मेष खानविलकर, एमएसएसए क्रिकेट सचिव नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडला.

























































