
बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी आणि पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यू 36 वर्षांचा झाला आहे.

मुलाच्या 36व्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने आठवणींच्या पोतडीतून काही खास फोटो बाहेर काढत सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जन्मापासून ते आतापर्यंतचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर करत भाग्यश्रीने मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू हा अभिनेता असून त्याने मिनाक्षी सुंदरेश्वर, मोनिका ओ माय डार्लिंग, आँख मिचोली यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

तू माझे आयुष्य बदलून टाकलेसय… प्रेमाने गुंडाळलेले स्वप्न, माझे जग… तू माझा लाडका मुलगा आहे. माझे स्वत:चे म्हणता येईल अशा त्या चिमुकल्या आनंदाच्या गोळ्यापासून ते आजचा हॅण्डसम, गुणी आणि खंबीर आधारस्तंभ ज्याच्यावर आम्ही विश्वासाने विसंबून राहू शकतो… हा प्रवास आठवताना माझ्या चेहऱ्यावर हसू येतंय. यातील प्रत्येक फोटो एक खास आठवण जपून आहे, असे कॅप्शन भाग्यश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंसोबत दिले आहे.
View this post on Instagram





























































