BSNL च्या संचालकांचा ‘शाही थाट’; प्रयागराज संगमावर अधिकाऱ्यांना Underwear आणि Hair oil आणण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bsnl director vivek banzal underwear hair oil task controversy jyotiraditya scindia order action saamana news

BSNL बोर्डाचे संचालक विवेक बन्झल यांच्या प्रयागराज दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रोटोकॉलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या दौऱ्यात अधिकाऱ्यांना चक्क ‘अंतर्वस्त्रे आणि हेअर ऑईल’ अशा गोष्टी आणण्यासारखी कामे नेमून देण्यात आल्याने केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. हा प्रकार ‘अयोग्य, अस्वीकार्य आणि धक्कादायक’ असल्याचे मंत्र्यांनी म्हटले आहे.

अधिकृत आदेशानुसार, BSNL (CFA) चे संचालक विवेक बन्झल २५ ते २६ फेब्रुवारी दरम्यान प्रयागराज दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी आणि वैयक्तिक गरजांसाठी काढण्यात आलेल्या कामांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. या दौऱ्यासाठी सुमारे ५० अधिकाऱ्यांना २० प्रकारची कामे नेमून देण्यात आली होती.

बन्झल प्रयागराजमध्ये आल्यावर संगमावर स्नान, नौकाविहार आणि बडे हनुमान मंदिर, अक्षयवट व पाताळपुरी मंदिरांना भेट देणार होते. या ‘स्नान’ किटमध्ये टॉवेल, अंतर्वस्त्रे (Undergarment), चप्पल (आदेशात ‘स्लीपर’ असा उल्लेख), कंगवा, आरसा आणि तेलाची बाटली ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच घाटावर बेडशीटची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. इतकेच नाही तर हॉटेल आणि सर्किट हाऊसवर ड्रायफ्रूट्स, फळांचे बाऊल, शेव्हिंग किट, टूथपेस्ट, ब्रश आणि शॅम्पूची व्यवस्था करण्याचे कामही अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते.

कारणे दाखवा नोटीस आणि दौरा रद्द

हा अजब प्रोटोकॉल व्हायरल झाल्यानंतर बन्झल यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. सरकारने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून ७ दिवसांत उत्तर मागितले आहे. या प्रकरणाला सरकार सहजासहजी सोडणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. BSNL ने देखील यावर स्पष्टीकरण दिले असून, हा प्रकार कंपनीच्या व्यावसायिक मानकांच्या आणि मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. संबंधित दोषींवर कारवाई करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३४ वर्षांचा अनुभव तरीही वाद

विवेक बन्झल हे १९८७ च्या बॅचचे दूरसंचार सेवा अधिकारी आहेत. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई, कॉम्प्युटर सायन्समध्ये एमई आणि एमबीए अशा पदव्या आहेत. दूरसंचार क्षेत्रात त्यांना ३४ वर्षांहून अधिक अनुभव आहे, मात्र या विचित्र प्रोटोकॉलमुळे त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.

bsnl director vivek banzal underwear hair oil task controversy jyotiraditya scindia order action saamana news

Union Minister Jyotiraditya Scindia orders action against BSNL Director Vivek Banzal over shocking protocol involving underwear and hair oil tasks for officials in Prayagraj. Details on Saamana.com.

Keywords

Saamana, Samana, Samna, दैनिक सामना, सामना, BSNL, Jyotiraditya Scindia