
ईडीने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा मुंबईतील पाली हिल येथील ‘अबोड’ बंगला सील केला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने केलेल्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लॉण्डरिंगविरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अंबानी यांचे हे घर देशातील सर्वात महागडय़ा घरांपैकी एक आहे. हा बंगला 17 मजली असून याची किंमत 3716.83 कोटी आहे.




























































