
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला होता. सुरुवातीला इराणने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र इराणी माध्यमांनी याच पुष्टी दिली आहे. शनिवारी आपल्या कार्यालयात बसलेले असताना झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि मुख्य वृत्तवाहिनी ‘प्रेस टीव्ही’ने अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. इस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती ‘प्रेस टीव्ही’ने दिली.
Leader of the Islamic Revolution Ayatollah Seyyed Ali Khamenei was martyred in Israeli-American attack on Saturday. pic.twitter.com/dx80n47GoR
— IRNA News Agency ☫ (@IrnaEnglish) March 1, 2026
दरम्यान, इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये खामेनी यांच्यासह त्यांच्या घरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांची मुलगी, जावई, आणि नात यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.
Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी
बदला घेण्याचा इशारा
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आपल्या निवेदनात इमाम खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या संघटनेने त्यांच्या मृत्यूचा उल्लेख सन्माननीय शहादत असा केला असून त्यांचा मार्ग पुढे चालू राहील, असे म्हटले आहे. निवेदनात या घटनेसाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरण्यात आले आहे. खामेनींचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हणत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बदला घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच, जनतेला राष्ट्रीय एकता आणि मजबुती दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणचे घातक ड्रोन जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापर्यंत पोहोचले, खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले #israil #iranisraelwar #America pic.twitter.com/G5JF3YW5qy
— Saamana Online (@SaamanaOnline) March 1, 2026

























































