चंद्रग्रहणामुळे टीम इंडियाचं सराव सत्र दुपारऐवजी संध्याकाळी? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-२० विश्वचषकातील हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा उपांत्य सामना गुरुवारी, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी सज्ज होण्यासाठी दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले असून आज त्यांचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र आज होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या सराव सत्राच्या वेळेत अचानक बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

‘एबीपी माझा’ने सूत्रणाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाने चंद्रग्रहणाचा काळ लक्षात घेता दुपारचे नियोजित सराव सत्र टाळण्याचा निर्णय घेतला. या बदलामुळे आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुपारी मैदानात न उतरता संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत फ्लड लाईट्समध्ये सराव करताना दिसेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहणाच्या कालावधीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून सराव सत्राची वेळ आता संध्याकाळची निश्चित करण्यात आली आहे.

एकीकडे हिंदुस्थानी संघाने वेळ बदलली असली, तरी प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाने मात्र त्यांच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार दुपारीच सराव सत्राला सुरुवात केली आहे