
मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी भरती सुरू आहे. मैदानी धावणी चाचणीदरम्यान उमेदवाराने चौथ्या फेरीत गैरप्रकार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार सहाय्यक पोलीस निरीक्षक हे मैदानात असताना एक पोलीस शिपाई त्यांच्याकडे आला. त्याने एका उमेदवाराची माहिती दिली. त्या उमेदवाराने 1600 मीटर अंतर पूर्ण न करता ते अंतर पूर्ण केल्याचे भासवल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदार सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी उमेदवाराची गुणपत्रिका तपासली आणि गैरप्रकार उघड झाला.



























































