
टाटा ग्रुपची एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आलोक सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आलोक सिंह यांच्या नेतृत्वाखालीच एअर इंडिया एक्सप्रेसने एअरएशिया इंडियाच्या स्वतःमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली होती. आलोक सिंह 9 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन सरकारी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसचे सीईओ बनले होते. त्यानंतर 19 मार्च 2023 रोजी त्यांना तीन वर्षांसाठी एमडी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी प्रतिज्ञापत्र
शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासंबंधीच्या याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान त्रावणकोर देवस्वओम बोर्ड (टीडीबी) मंदिरातील परंपरा सुरक्षित राहावी यासाठी कोर्टात प्रतीज्ञापत्र सादर करणार आहे. टीडीबीचे अध्यक्ष जयकुमार यांनी यासंबंधी माहिती दिली. प्रतीज्ञापत्र दाखल करण्यासाठी बोर्डाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रथेनुसार, भगवान अयप्पा मंदिरात मासिक पाळीच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी आहे.
केरळ हायकोर्टात सात अतिरिक्त न्यायाधीशांना बढती
केंद्र सरकारने केरळ हायकोर्टातील सात अतिरिक्त न्यायाधीशांना बढती देत कामयस्वरूपी न्यायाधीश बनवले आहे. कायदा मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या सात अतिरिक्त न्यायाधीशांना प्रमोशन मिळाले आहे त्यामध्ये न्यायाधीश मुल्लापल्ली अब्दुल अजीज अब्दुल हकीम, न्यायाधीश श्याम कुमार वडक्के मुदावक्कट, न्यायाधीश हरिशंकर विजयन मेनन, न्यायाधीश मनु श्रीधरन नायर, न्यायाधीश ईश्वरन सुब्रमणि, न्यायाधीश मनोज पुलम्बी माधवन आणि न्यायाधीश मरक्कपराम्बिल भार्गवन स्नेहलता या न्यायाधीशांचा समावेश आहे.
हिंसाचारानंतर अमेरिकी दूतावासात व्हिसा सेवा स्थगित
पाकिस्तानमध्ये अमेरिकी दूतावासांबाहेर हिंसाचार उसळल्यानंतर अमेरिकी सरकारने अलर्ट जारी केला आहे. लाहोर आणि कराचीमध्ये आंदोलन, हिंसाचार आणि इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये लोक रस्त्यावर उतरल्याने अमेरिकन दूतावासामध्ये व्हिसा सेवा देणे बंद केले आहे. अमेरिकन नागरिकांनी स्थानिक वृत्तमानपत्र वाचावे, गर्दीपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने मागणी केली आहे की, पाकिस्तानींचे सर्व व्हिसा, ग्रीन कार्ड रद्द करायला हवेत.
























































