Mumbai News – क्षुल्लक वादातून वडाळ्यात तरुणाची हत्या, चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वडाळा परिसरात होळी सणाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तुषार उज्जैनवाला (22) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास वडाळ्यातील कोकरीपाडा येथे ही घटना घडली. होळी साजरी केल्यानंतर आरोपी बिअर पित बसले होते. यादरम्यान, मयत तुषार तेथून जात असताना त्याचा पाय चुकून एका आरोपीला लागला. यावरून पीडित आरोपीमध्ये वाद झाला. यानंतर तुषारने घरी मोठ्या भावाला घटनेबाबत माहिती दिली.

यानंतर दोघे भाऊ पुन्हा आरोपींना जाब विचारण्यास गेले असता आरोपींनी त्याला गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तुषारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींना अटक केली. पुढील कारवाई सुरू आहे.