
देशभरात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सची संख्या 102.86 कोटींवर पोहोचली आहे, अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने दिली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सची संख्या जवळपास 101.78 कोटी होती. डिसेंबरपर्यंत 102.86 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये 98.32 कोटी लोकांकडे मोबाईल इंटरनेट आहे, तर 4.53 कोटी लोक ब्रॉडबँडचा वापर करतात. हाय स्पीड डेटा म्हणजेच ब्रॉडबँड युजर्सची संख्या आता 100 कोटी पार झाली आहे. एकूण टेलिपह्न ग्राहकांची संख्या 130.61 कोटी झाली.

























































