
तोतया सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून छापेमारी करणाऱ्या टोळीवर आधारित असलेल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटाला शोभेल अशीच काहीशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. पाच लाखांच्या बदल्यात सात लाख रुपये देतो अशी बतावणी करून आठ बोगस पोलिसांनी एकाला गंडा घातला. या प्रकरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आठही तोतयांना अवघ्या ३६ तासांत वेगवेगळ्या ठिकाणाहून बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून सवादोन लाखांची रोकड, दोन स्कॉर्पिओ आणि नऊ मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सोमटणे टोलनाक्यावरून उचलले
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे राहणारे दीपक शिंदे यांना पाच लाख पोलीस पथकाने मोबाईल लोकेशनचा तपास केला असता आरोपी जुन्या पुणे महामार्गावरून जात असल्याने समोर आले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांनी सोमाटणे फाटा टोलनाक्यावरून संजय भोसले, गौसपाक शेख, सोमीनाथ गायकवाड, अरविंद जॉजट यांना अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरित आरोपी आळंदीमार्गे पळून जात असताना पोलिसांनी उमाशंकर पांडे, शरद मोहन, नरेश शर्मा, लक्ष्मण धनवे यांच्या मुसक्या आवळल्या.
रुपयांच्या बदल्यात सुट्या नोटा बदलून सात लाख रुपये देतो असे सांगून तोतया पोलिसांनी कल्याण पूर्वेत बोलावून घेतले. शिंदे ठरलेल्या ठिकाणी येताच आठ बोगस पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. आम्ही पोलीस आहोत, इतकी रोख रक्कम आली कुठून, अशी दमबाजी करत त्यांच्या हातातील पैशांनी भरलेली बॅग घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून हे सर्व तोतया पोलीस पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी तत्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हे शोध विशेष पथकाला तपासाचे आदेश दिले.

























































