
US Israel Iran War आता अधिक चिघळत चालले आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनी घायाळ झालेला आणि बिथरलेला इराण आता भयंकर धमक्या देऊ लागला आहे. इस्रायल मधील ‘डिमोना’ अणू प्रकल्प उद्ध्वस्त करणार अशी धमकी दिली आहे.
इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इस्रायलच्या ‘डिमोना’ (Dimona) या अणू ऊर्जा केंद्राला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. जर अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील इस्लामिक राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला, तर हा हल्ला केला जाईल, असे तेहरानने स्पष्ट केले आहे.
खामेनींना अखेरचा निरोप
अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात मारले गेलेले सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तेहरानमधील ‘ग्रँड मोसल्ला’ संकुलात तयारी सुरू आहे. तीन दिवसांच्या या शोकसोहळ्यात लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
ऑपरेशन ‘ट्रू प्रॉमिस ४’
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) गुरुवारी ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४’ ची १९ वी लाट सुरू केली आहे. ‘या हसन इब्न अली’ या सांकेतिक नावाने सुरू केलेल्या या मोहिमेत इस्रायलमधील मुख्य ठिकाणांवर आणि अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांचा मोठा वर्षाव करण्यात आला आहे.
इस्रायलमध्ये भीतीचे वातावरण
इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मध्य इस्रायल, जेरुसलेम आणि वेस्ट बँकच्या काही भागांत धोक्याचे सायरन वाजत आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून इस्रायली संरक्षण दले (IDF) हाय अलर्टवर आहेत.
इस्रायलचा पलटवार: इस्रायलचे संरक्षण मंत्री
इस्रायल कात्झ यांनी स्पष्ट केले आहे की, इराणच्या गादीवर जो कोणी नवीन नेता येईल, त्याला संपवणे हे आमचे कायदेशीर लक्ष्य असेल. म्हणजेच हा संघर्ष थांबण्याऐवजी नेत्यांच्या ‘हंटिंग’ (Elimination) पर्यंत पोहोचला आहे.
Iran threatens to hit israels dimona nuclear site; khamenei funeral preparations begin
Iran vows to attack israels dimona nuclear facility if the regime is toppled. meanwhile, funeral preparations for ayatollah khamenei underway in tehran. check latest war news.
दरम्यान, इस्रायल पूर्ण अॅलर्ट मोडवर आहे. त्यांनी सुरक्षा डोम अधिक सतर्क ठेवले आहे. वेळोवेळी सायरन वाजवून बचावासाठी नागरिकांना अॅलर्ट केले जात आहे. देशातील विविध शहरांमध्ये देखील लोकांच्या हालचालींवर बारीक लक्षं ठेवण्यात येत आहे.

























































