
शिवजयंती उत्सव शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अभूतपूर्व उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रेल कामगार सेनेतर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन केले होते. स्थानक परिसर भगव्या झेंडय़ांनी भगवामय झाला होता. उत्सवानिमित्ताने दिवसभर स्थानकात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष सुरू राहिला. तसेच पोवाडे आणि शौर्यगीतांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले.
शिवरायांच्या पुतळय़ाला दुग्धाभिषेक आणि पूजन करून उत्सवाची सुरुवात झाली. शिवसेना नेते, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. उत्सवाला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, संपर्कप्रमुख (कुलाबा विधानसभा) विकास मयेकर, शिवसेना उपनेते व रेल कामगार सेना सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस उमेश नाईक, कार्याध्यक्ष शैलेश शिंदे, सरचिटणीस विजय शिरोडकर, मुंबई डिव्हिजन अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, सचिव तुकाराम कोरडे, महिला आघाडी सरचिटणीस सोनाक्षी मोरे, प्रभा गुप्ता, कमर्शियल विभागाचे पदाधिकारी कृष्णा रनशूर, हिरेन अंजारा, कुर्ला कारशेडचे प्रथमेश शिंदे, चेतन साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर हरीश मीना यांनीही उत्सवाला भेट देऊन शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला.
अश्वारूढ पुतळय़ासाठी स्वाक्षरी मोहीम; 10 हजारांहून अधिक मुंबईकरांचा प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महाव्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात उभारावा, या मागणीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मोहिमेला तब्बल दहा हजारांहून अधिक मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तिरुमलेश अंबाला, अजय कुमार डी. विवेक विक्रम, प्रदीप पाटील, हरीश वाघेला, पी. के. शर्मा, सचिन जोशी, महेंद्र म्हात्रे, मेघश्याम शिरोडकर, अभय वर्तक, विकास पाटील, मंगेश पाटील, नीलेश पाटील, पी.ए.ई. राज, सतीश देसाई, सुशांत पैठणकर आदी पदाधिकाऱयांनी विशेष मेहनत घेतली. पुढील तीन दिवस स्वाक्षरी मोहीम सुरू राहणार आहे.
शिव-आदर्श सेवा मंडळाच्या वतीने ग्रँट रोड येथे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने सेवासदन आणि सुदंता शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर आणि शालेय वस्तूंचे वाटप शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, समन्वयक अरविंद बने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विभागातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्टेशन परिसरातील बेघर मुलांना अन्न वाटप करण्यात आले. या वेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, युगंधरा साळेकर, किरण बाळसराफ, विजय पवार, शशिकांत पवार, हेमंत दुधवडकर, मंडळाचे अध्यक्ष बाळ खानोलकर, माई परब, सुरेखा उबाळे, सुप्रिया शेडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप धुळप, कृष्णा बाईंग, राजेश कांगणे, अनुराग राणे यांनी विशेष मेहनत घेतली.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे संकुलाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संकुलाचे चैतन्य बडे, राजेश घाग, अभिजित शिंदे, पवन तिवारी, कुणाल राठोड उपस्थित होते.

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा खोपकर व शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कल्याण शहर शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपनेते विजय साळवी, बाळा परब, दया शेट्टी, विश्वनाथ जाधव, रवी कपोते, रेखा पंटे, प्रदीप साळवी, उमेश बोरगावकर, संकेश भोईर, विशाल गारवे उपस्थित होते.

अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अलिबाग शहरप्रमुखे अॅड. संदीप पालकर यांनी अभिवादन केले. यावेळी उपशहरप्रमुख वसंत जैन, मिलिंद खानोलकर उपस्थित होते.




























































