
एआय आल्यापासून बरीच कामे ही ऑटोमेटिक मोडवर होत आहेत. आता कॉम्प्युटरसुद्धा कोणत्याही माणसाशिवाय काम करू शकणार आहे. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआयने नवीन मॉडल जीपीटी 5.4 लाँच केले आहे. हे एआय मॉडल अनेक प्रोफेशनल काम करू शकेल. यात असा एक कोड आहे जो कॉम्प्युटरला कंट्रोल करण्यास मदत करू शकेल. हे की बोर्ड आणि माऊस कमांडपर्यंत पाठवू शकतो. यामध्ये प्रेझेंटेशन, स्प्रेडशीट्स आणि डॉक्युमेंट तयार करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. 5.4 मध्ये रीजनिंग, कोडिंग आणि ऑफिससंबंधी कॉमन टास्कला आणखी चांगले बनवले आहे. 5.4 ला ओपनएआयच्या अनेक प्रोडक्ट्समध्ये रोलआऊट केले जात आहे.




















































