
मुंबईत लोकलच्या गर्दीत प्रवास करायचा अनेकांना कंटाळा येतो. अनेक जण गर्दीतून प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा खिशातील पाकीट, मोबाईल हरवले जातात.
मुंबई लोकलने प्रवास करताना कदाचित मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर सर्वात आधी पुढच्या स्टेशनवर उतरून आरपीएफकडे तक्रार नोंदवा.
रेल वन ऍप डाऊनलोड करून प्रवासात हरवलेल्या फोनची तक्रार नोंदवा. तक्रारीवर निश्चित कारवाई करून तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल देण्याचा प्रयत्न करेल.
तुमच्या मोबाईल सेवा प्रदात्याशी संपर्क साधा आणि सिमकार्ड ब्लॉक करायची विनंती करा. यामुळे मोबाईलचा गैरवापर होणार नाही अन् तुम्ही नवीन सिमकार्ड घेऊ शकता.
सीईआयर पोर्टलच्या ‘ब्लॉक/चोरलेला मोबाईल’ या पर्यायावर जाऊन तुमच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक, आधार-लिंक्ड पत्ता आणि तक्रारीचे तपशील भरा.






















































